बँक ऑफ महाराष्ट्रने 2018-19 वित्तीय वर्षातील 4783 कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत वर्ष 2019-20 मध्ये कमावला 389 कोटी रूपयांचा निव्वळ नफा


Posted June 17, 2020 by sameershah

पुणे, जून 16, 2020: बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने मंगळवार, 16 जून, 2020 रोजी बँकेच्या पुणे स्थित लोकमंगल या मुख्यालयी झालेल्या बैठकीत 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाही व आर्थिक वर्षाच्या निकालास मान्यता दिली.

 
कामगिरीची ठळक वैशिष्टे:
कार्यान्वयन कामगिरी:
 चौथी तिमाही - वित्तीय वर्ष कार्यान्वयन नफा वार्षिक आधारावर 18.73% ने वाढून रुपये 595 कोटी झाला.
 चौथी तिमाही - वित्तीय वर्षाचा निव्वळ नफा रुपये 58 कोटी झाला आहे.
 वित्तीय वर्ष 20 चा कार्यान्वयन नफा वार्षिक आधारावर 29.55% ने वाढून 2847 कोटी झाला आहे.
 वित्तीय वर्ष 19 मध्ये झालेल्या 4784 कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत बँकेचा वित्तीय वर्ष 20 मध्ये रुपये 389 कोटी निव्वळ नफा झाला आहे.
 वित्तीय वर्ष 19 मध्ये निव्वळ व्याज अंतर 2.53% होते, यावर्षी निव्वळ व्याज अंतर वाढून ते आता 2.60% झालेले आहे.
व्यवसाय वृद्धी :
 बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये वाढ झालेली आहे. आर्थिक वर्ष 20 मध्ये बँकेचा एकूण व्यवसाय मागील आर्थिक वर्षाच्या 2, 34, 117 कोटी रुपयांच्या तुलनेत रुपये 2, 44, 955 कोटी झाला आहे.
 बँकेच्या कासा (बचत आणि चालू खात्यांतील ठेवी) मध्ये देखील वाढ होवून दिनांक 31.03.2020 रोजी एकूण कासा ठेवी 50.29% झाल्या आहेत. गतवर्षी 31.03.2019 रोजी या ठेवी 49.65% होत्या.
 बचत खात्यांमधील ठेवींची वार्षिक आधारावरील वाढ 7.80% तर चालू खात्यांमधिल ठेवींची वाढ 9.32% झाली आहे.
 किरकोळ कर्जामध्ये 21.30% आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम कर्जे (एमएसएमई) यात 25.04% वृद्धी झाली आहे.
भांडवल स्थिती:
 आर्थिक वर्ष 20 मध्ये सर्वसाधारण भांडवल पर्याप्तता 13.52% इतकी असून कॉमन इक्विटी टियर 1 या बरोबरचे गुणोत्तर 10.67% आहे.
 तरलता संरक्षण गुणोत्तर 184.74% आहे.
मालमत्तेची (कर्जाची) गुणवत्ता (अॅसेट क्वालिटी):
 निव्वळ थकीत कर्जामध्ये गतवर्षीच्या तुलनेत दिनांक 31.03.2020 रोजी घट होवून 4.77% झालेली असून दिनांक 31.03.2019 रोजी निव्वळ थकीत कर्जे 5.52% इतकी होती.
 एकूण थकीत कर्जामध्ये गतवर्षीच्या तुलनेत दिनांक 31.03.2020 रोजी घट होवून 12.81% झाली असून दिनांक 31.03.2019 रोजी एकूण थकीत कर्जे 16.40% होती. .
 तरतूद संरक्षण गुणोत्तरामद्धे दिनांक 31.03.2020 रोजी वाढ होवून ते 83.97% झाले आहे. दिनांक 31.03.2019 रोजी हे गुणोत्तर 81.49% होते.
 दिनांक 17 एप्रिल 2020 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसृत केलेल्या कोविड-19 संदर्भिय परिपत्रकांवये बँकेने आवश्यक 5% कोविड-19 नियामक पॅकेज तरतूदीच्या म्हणजेच रुपये 38 कोटी रुपयांच्या तुलनेत एकूण रुपये 150 कोटींची तरतूद आर्थिक वर्ष 19-20 मध्ये केलेली आहे.
दिनांक 31 मार्च 2020 कालावधीचा नफा आणि तोटा खाते:
 31.03.2020 रोजी संपलेल्या वर्षासाठी कार्यान्वयन नफा रुपये 2847.06 कोटी झाला, जो 31.03.2019 रोजी संपलेल्या वर्षासाठी 2197.61 कोटी रुपये होता. हाच नफा 31.03.2020 रोजी संपलेल्या तिमाहीत रुपये 595.07 कोटी झाला, तर 31.03.2019 रोजी संपलेल्या तिमाहीत कार्यान्वयन नफा रुपये 501.18 कोटी होता.
 दिनांक 31.03.2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा निव्वळ नफा रुपये 388.58 कोटी झाला आहे जो की, दिनांक 31.03.2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या रुपये 4783.88 कोटी निव्वळ तोट्याच्या तुलनेत आहे. दिनांक 31.03.2020 रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा 57.57 कोटी रुपये झाला आहे.
 निव्वळ व्याज उत्पन्नामध्ये वाढ होवून ते दिनांक 31.03.2020 रोजी रुपये 4278.80 कोटी झाले आहे. गतवर्षी 31.03.2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये निव्वळ व्याज उत्पन्न रुपये 3733.48 कोटी होते. यामुळे एकूण वृद्धी रुपये 545.32 कोटी (14.61%) इतकी झाली आहे. दिनांक 31.03.2019 तिमाही समाप्तीस झालेल्या रुपये 999.93 कोटींच्या तुलनेत दिनांक 31.03.2020 तिमाही समाप्तीस निव्वळ व्याज उत्पन्न रुपये 1022.51 कोटी इतके झालेले आहे.
 निव्वळ व्याज अंतर (व्याज विस्तार आणि व्याज उत्पन्न मालमत्ता सरासरी यांचे गुणोत्तर) यामध्ये दिनांक 31.03.2020 रोजी वाढ होवून ते 2.60% झाले आहे. गतवर्षी दिनांक 31.03.2019 रोजी निव्वळ व्याज अंतर 2.53% इतके होते.
 कर्जावरील उत्पन्न दिनांक 31.03.2020 रोजी 7.23% झाले असून गतवर्षी दिनांक 31.03.2019 हे उत्पन्न 7.68% होते.
 गुंतवणुकीवरील उत्पन्न दिनांक 31.03.2020 वर्ष समाप्तीस 7.23% झाले

दिनांक 31.03.2020 रोजीचा ताळेबंद:
 एकूण व्यवसाय दिनांक 31.03.2020 रोजी रुपये 2, 44, 955 कोटी झाला असून गतवर्षी दिनांक 31.03.2019 रोजी तो रुपये 2, 34, 117 कोटी इतका होता.
 एकूण ठेवी गतवर्षीच्या दिनांक 31.03.2019 रोजीच्या रुपये 1, 40, 650 कोटींच्या तुलनेत दिनांक 31.03.2020 रोजी रुपये 1, 50, 066 कोटी झाल्या आहेत.
 कासा ठेवीमध्ये वाढ झालेली असून रुपये 69, 830 कोटींच्या तुलनेत दिनांक 31.03.2020 रोजी रुपये 75, 475 कोटी झाल्या आहेत. ही वार्षिक आधारावरील वाढ रुपये 5, 645 कोटी म्हणजेच 8.08% आहे. दिनांक 31.03.2020 रोजी कासा ठेवीत वाढ होवून 50.29% झाली आहे.
 सकल कर्जे 5.09 टक्यांनी वाढून दिनांक 31.03.2020 रोजी 86, 872 कोटी रुपये झालेली आहेत. ही कर्जे दिनांक 31.03.2019 रोजी 82, 666 कोटी होती.
भांडवल पर्याप्तता
 बेसल III अन्वये भांडवल पर्याप्तता गुणोत्तर दिनांक 31.03.2020 रोजी 13.52% झाले आहे तर दिनांक 31.03.2019 रोजी हे गुणोत्तर 11.86% होते.
 बँकेनी सीईटी-1 भांडवल गुणोत्तर 10.67% राखले असून हे किमान विहित प्रमाणापेक्षा जास्त आहे. हे प्रमाण विविध मार्गांनी भांडवल वाढवण्याची क्षमता देखील सहजपणे प्रतिबिंबित करते
मालमत्तेची (कर्जाची) गुणवत्ता
 दिनांक 31.03.2020 रोजी सकल थकीत कर्जे आणि निव्वळ थकीत कर्जे रुपये 12, 152 कोटी (12.81%) आणि 4, 145 कोटी रुपये (4.77%) झाली आहेत तर हीच कर्जे गतवर्षी 31.03.2019 रोजी 15, 324 कोटी रुपये (16.40%) आणि 4, 559 कोटी रुपये (5.52%) होती. सकल आणि निव्वळ यांचा दिनांक 31.12.2019 रोजी स्तर अनुक्रमे रुपये 15, 746 कोटी (16.77%) आणि रुपये 4, 507 कोटी (5.46%) होता.
 31 31.03.2020 रोजी तरतूदीची पर्याप्तता दर्शविल्यानुसार तरतूद संरक्षण गुणोत्तरात वाढ होवून ते 83.97% झाले.
कोविड -19 संसर्ग आव्हानांना बँक ओफ महाराष्ट्रचे प्रतिसाद
 गेल्या अनेक आठवड्यांमध्ये कोविड -19 या साथीच्या देशभर पसरलेल्या आजाराविरोधात संपूर्ण देश अभूतपूर्व पद्धतीने झुंझत असताना पाहिले आहे.बँकेने या गंभीर स्थितीला ओळखून बँकेने ग्राहक / कर्मचारी यांच्या कल्याणार्थ विविध सहाय्यकारी उपाय योजिले. बँकेच्या 97.50% पेक्षा अधिक शाखा आणि 88% एटीएम्स कार्यरत होते.
 बँकेने 30 जून 2020 या दरम्यान बँकेच्या चालू आणि बचत खात्यांमधील सेवा शुल्काना सूट दिली. बँकेने आपातकालीन क्रेडिट लाईन गॅरंटी योजना अंतर्गत जीईसीएल योजनेचा प्रारंभ केला आहे. या योजनेंतर्गत बँक वित्तीय वर्ष 2019-20 साठी रु. 100 कोटी पर्यन्तच्या वार्षिक उलाढाल करणार्‍या सर्व व्यावसायिक खात्यांसाठी एकूण बाकी कर्जाच्या (अधिकतम रु. 25 कोटी पर्यन्त) 20% पर्यन्त खेळते भांडवल कर्जाचा प्रस्ताव दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचार्‍यांनी पंतप्रधान सहाय्यता कोषामध्ये रु. 5 कोटी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता कोष कोविड-19 साठी 1 कोटी रुपयांचे अंशदान दिलेले आहे. शाखेत ग्राहक आल्यानंतर त्यांच्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय जसे की, मास्क, सॅनिटायझर देणे आणि सामाजिक अंतर राखणे आदी उपाय बँकेने केले आहेत. देशांतर्गत 32 विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्राने मास्क, हातमोजे, पाण्याच्या बाटल्या, अन्नाची पाकिटे, कॅनॉपी-छत्र्या, किराणा साहित्यांचे वितरण करून कोरोंना योध्याची भूमिका समर्थपणे वठवली आहे.
-- END ---
Share Facebook Twitter
Print Friendly and PDF DisclaimerReport Abuse
Contact Email [email protected]
Issued By Kishor
Country India
Categories Accounting , Banking , Finance
Last Updated June 17, 2020