मुंबई –ठाणे लोकल्समध्ये अत्यावश्यक सेवेतील बँक कर्मचार्यांोना प्रवासाची सूट देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीची संयोजक बँक ऑफ महाराष्ट्राचा पुढाकार


Posted June 22, 2020 by sameershah

पुणे, 20 जून; 2020: राज्यस्तरीय बँकर्स समितीची संयोजक बँक ऑफ महाराष्ट्रने राज्याच्या मुख्य सचिवांना दिनांक 16 जून रोजी पत्राद्वारे विनंती केली आहे.

 
पुणे, 20 जून; 2020: राज्यस्तरीय बँकर्स समितीची संयोजक बँक ऑफ महाराष्ट्रने राज्याच्या मुख्य सचिवांना दिनांक 16 जून रोजी पत्राद्वारे विनंती केली आहे की, अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत बँक कर्मचार्यांननादेखील कार्यालयाला जाण्या-येण्यासाठी आणि ग्राहकांना अखंडीत आणि नियमित सेवा पुरविण्यासाठी लोकल-ट्रेन्स प्रवासाची सूट देण्यात यावी.

नुकतेच पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने राज्य शासनाने आवश्यक सेवांमधील कर्मचार्यां साठी मुख्य आणि हार्बर मार्गावर निवडक उपनगरी लोकलच्या सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्रने ही विनंती केलेली आहे.

कोरोंना महामारीच्या संपूर्ण लॉकडाउन काळामधे राज्य आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचांनानुसार अत्यावश्यक सेवेतील बँक कर्मचार्यांणनी देखील राज्याच्या पोलीस, वैद्यकीय सेवेतील संबंधितांबरोबरीने सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी सेवा पुरविली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असणार्याा मुंबई येथे बहुतेक बँकांची मुख्य कार्यालये आहेत. यामुळे मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई आणि ठाणे अशा मोठ्या आकाराच्या भौगोलिक क्षेत्रात मोठ्या संख्येने बँक कर्मचारी असून त्यांना लोकल्स-ट्रेन्समधून प्रवास करणे गरजेचे आहे.

तथापि, आम्हाला बॅंकिंग वर्तुळातून असे कळते की, राज्य सरकारतर्फे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून बँक कर्मचार्यां ना या यादीमध्ये सूचीबद्ध न केल्या गेल्यामुळे लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास बँकेच्या कर्मचा्यांना रेल्वे अधिकार्यांतकडून परवानगी दिली जात नाही.

या प्रकरणी राज्य प्रशासनाने लक्ष घालून लवकरच अनुकूल निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
-- END ---
Share Facebook Twitter
Print Friendly and PDF DisclaimerReport Abuse
Contact Email [email protected]
Issued By sameer shah
Business Address Bank of Maharashtra Head Office Lokmangal, 1501, Shivajinagar Pune-411005
Country India
Categories Accounting
Last Updated June 22, 2020