बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे कोविड पतपुरवठा सहाय्य


Posted May 26, 2020 by sameershah

मार्च-20 ते मे-२० तिमाहीत महाबँकेची एक लाख लाभार्थींना 2789 कोटी रुपयांची कर्जे

 
पुणे मे, 24; 2020: जिव्हाळ्याची सेवा आणि अनुकूल कर्ज योजना तसेच सुविधांसाठी सुप्रसिद्ध असणार्‍या बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे व्यवसायिक आस्थापनांचे दैनंदिन खर्च आणि वैधानिक थकबाकी पूर्ण होण्याकरिता आर्थिक तरलतेच्या (लिक्विडिटी) समस्येवर मात करण्यासाठी उदार अटींवर सुलभ कर्ज वितरित केले आहे. कोविड 19 मदत उपायांतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग तसेच कृषी आणि किरकोळ विभागांना अतिरिक्त कर्ज सहाय्य दिले आहे.
मार्च २०२० ते मे २०२० या तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे 1 लाख कृषी, एमएसएमई, स्वसहायता गट, किरकोळ, एमएसएमई क्षेत्रांतर्गत लाभार्थींना 2789 कोटी रुपयांची कर्जे बँकेने मंजूर केली आहेत.

'एक कुटुंब’ या संकल्पनेप्रमाणे कार्य करणार्‍या बँक ऑफ महाराष्ट्रने अत्यंत कार्यक्षमतेने एसएमएस, ईमेल ,वेबिनार आणि समर्पित टीमच्या माध्यमातून आणि शाखांकडून दूरध्वनीद्वारे प्रत्येक ग्राहकामधे जागरूकता वाढविण्याच्या उपाययोजना सुरू केल्या असून बँकेच्या सोई-सुविधांची माहिती देवून त्यांना सहाय्य करण्याकरिता संपर्क साधला गेलेला आहे.

सन्माननीय अर्थमंत्र्यांद्वारे घोषित केलेल्या प्रेरणा पॅकेजचा विस्तार करण्यासाठी आणि व्यापार तसेच व्यवसायांच्या पुनर्प्रारंभ कार्यकृतींना सहकार्य करून उत्तेजन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आता पूर्णपणे सज्ज झालेली आहे.
-- END ---
Share Facebook Twitter
Print Friendly and PDF DisclaimerReport Abuse
Contact Email [email protected]
Issued By BOM
Business Address Bank of Maharashtra Head Office Lokmangal, 1501, Shivajinagar Pune-411005
Country India
Categories Banking
Tags bank og maharashtra , bom
Last Updated May 26, 2020