एका यकृतामुळे दोघांना जीवनदान


Posted December 23, 2019 by psachin123

'स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट' म्हणजे काय? देशात अनेक रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे. दुसरीकडे अवयवांचा तुटवडा जाणवतो आहे. एकाच अवयवासाठी गरजूंची संख्या अधिक असताना 'स्प्लिट लिव्हर ट्रान्स्प्लांट'सारखा प्रयोग करणे फायद्याचे ठरते.

 
एकाच वेळी दोन गरजू रुग्णांना एकाच 'ब्रेन डेड' रुग्णाच्या यकृताचे दोन भाग करून अवयव प्रत्यारोपण
करण्याचा प्रकार पहिल्यांदाच पुण्यात घडला. या निमित्ताने 'स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट ची संकल्पना पुण्यात प्रत्यक्षात
आली. यामुळे पाच वर्षांच्या बालकासह एका २६ वर्षांच्या तरुणीचे प्राण वाचले. एका अपघातामध्ये २७ वर्षांचा तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना त्याला 'ब्रेनडेड' म्हणून जाहीर करण्यात आले. त्या तरुणाचा रक्तगट 'ए पॉझिटिव्ह' होता. त्याचे
आई-वडील आणि बहिणीने त्याचे अवयवदान करण्यास संमती दिली. त्याचे यकृत, दोन मूत्रपिंड आणि स्वादुपिंडअसे अवयव काढण्यात आले. दोन रुग्णांना 'अॅक्युट लिव्हर फेल्युअर'चा त्रास असल्याने त्या दोघांनाही यकृताची गरज होती. त्या दोघांचे रक्तगट 'ए पॉझिटिव्ह' होते. त्यामुळे पहिल्यांदाच 'स्प्लिट लिव्हर ट्रान्स्प्लांट' करण्यात आले. एकाच यकृताचे दोन भाग करून दोघे रुग्णांना जीवदान देण्यात आले,' र अशी माहिती पुणे प्रादेशिक प्रत्यारोपण न समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली. याच रुग्णाचे स्वादुपिंड आणि वे मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण डेक्कन येथील वे सह्याद्री रुग्णालयात करण्यात आले. वे सह्याद्री रुग्णालयाचे यकृतप्रत्यारोपण ड तज्ज्ञ डॉ. बिपिन विभुते म्हणाले, 'आंध्र - प्रदेशातील एक कुटुंब नोकरीसाठी पुण्यात एका महिन्यापूर्वी आले होते. त्यांच्या पाच वर्षांच्या बालकाला कावीळ झाली. त्या २ वेळी 'अॅक्युट लिव्हर फेल्युअर'चे निदान व झाले. त्यामुळे तातडीने यकृत प्रत्यारोपण न करण्याची गरज होती. आई-वडलांचे यकृत काही कारणास्तव देता येत नव्हते. आजी आजोबांचे यकृत वयोमानानुसार
देणे शक्य नव्हते. त्यामुळे 'सुपर अर्जट वेटिंग लिस्ट मध्ये या बाळाचे नाव नोंदविण्यात आला. त्या बालकाला
यकृताचा लहान भाग देऊन प्रत्यारोपण यशस्वी करण्यात आले.' मंगेशकर रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. निनाद देशमुख
म्हणाले, '२६ वर्षांच्या तरुणीला अॅक्युट लिव्हर फेल्युअर ची निदान झाली. प्रौढ असल्याने यकृताचा मोठा भाग तिला प्रत्यारोपित करण्यात आला. माझ्यासह डॉ. वृषाली पाटील, डॉ. सचिन पळणीटकर यांनी हे प्रत्यारोपण
। यशस्वी केले.'
-- END ---
Share Facebook Twitter
Print Friendly and PDF DisclaimerReport Abuse
Contact Email [email protected]
Issued By Dr. Sachin Planitkar
Business Address Health Plaza Opp Polaris Health Care, Datta Mandir Rd, Shankar Kalate Nagar, Wakad, Pune, Maharashtra 411057
Country India
Categories Advertising , Arts , Blogging
Tags gastroenterologist in pune , hepatologist in pune , liver transplantation in pune
Last Updated December 23, 2019